Pune News : गोळीबारप्रकरणी मुख्य आरोपीस अखेर अटक

निंबूत ता. बारामती : येथील गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी गौतम काकडे यास रविवारी (ता. ३० जून) रात्री उशिरा अटक करण्यात पोलिसांना यश आले. बैलगाडा क्षेत्रातील गौतम काकडे यांनी फलटण येथील बैलगाडा क्षेत्रातीलच रणजित निंबाळकर यांचा ‘सुंदर’ नावाचा प्रसिद्ध बैल २४ जून रोजी पाच लाख रुपये इसार देऊन खरेदी केला होता.
Pune News
Pune Newssakal
Updated on

सोमेश्वरनगर : निंबूत (ता. बारामती) येथील गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी गौतम काकडे यास रविवारी (ता. ३० जून) रात्री उशिरा अटक करण्यात पोलिसांना यश आले. बैलगाडा क्षेत्रातील गौतम काकडे यांनी फलटण येथील बैलगाडा क्षेत्रातीलच रणजित निंबाळकर यांचा ‘सुंदर’ नावाचा प्रसिद्ध बैल २४ जून रोजी पाच लाख रुपये इसार देऊन खरेदी केला होता. त्यानंतर तीन दिवसांनी गुरुवारी रात्री उर्वरित ३२ लाख रक्कम नेण्यासाठी बोलावले होते. निंबाळकर हे पत्नी, मुलगी, दोन मित्रांसह पैसे गौतम काकडे यांच्या घरी गेले. घरासमोर चर्चेतून वादावादी झाली. याप्रसंगी गौतम काकडे यांनी तीन तरुणांना व बंधू गौरव याला बोलावून घेतले. गौरव काकडे यांनी पिस्तुलातून थेट रणजित यांच्या डोक्यात गोळी झाडली होती.

याप्रकरणी गौतम, गौरव व अन्य तीन अनोळखी तरुणांविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. तर, पिस्तूल परवानाधारक असल्याने सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे यांना अटक केली होती. दरम्यान, पुणे येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना शनिवारी पहाटे रणजित यांचा मृत्यू झाला. त्यामुळे संतापाची लाट उसळली आणि आरोपींवर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी घटनेच्या दिवशीच गौरव आणि शहाजीराव काकडे यांना अटक केली.

दोघांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी मिळाली होती. सोमवारी पुन्हा बारामती न्यायालयात हजर केले असता दोघांनाही एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, फरारी असलेले मुख्य आरोपी गौतम काकडे यांना त्वरित अटक करून शासन करा, या मागणीसाठी वडगाव निंबाळकर व फलटण पोलिस ठाण्यावर शेकडो लोकांनी धाव घेतली होती. अखेर रविवारी रात्री भोर परिसरातून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गौतम काकडे यांना अटक केली.

दरम्यान, तीन अनोळखी युवकांपैकी सचिन वसंत मोटकट्टे (वय २४, रा. पलूस, जि. सांगली) व अजित किसन मोरे (रा. निंबूत) या दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. सोमवारी सायंकाळी बारामती न्यायालयाने गौतम काकडे, मोटकट्टे व मोरे या तिघांनाही चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.