esakal | महाराष्ट्राचे मंत्रीच मराठीचे मारेकरी- रामदास फुटाणे
sakal

बोलून बातमी शोधा

ramdas-futane

महाराष्ट्राचे मंत्रीच मराठीचे मारेकरी- रामदास फुटाणे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : ज्यांच्या हातात लेखणी आहे, असे साहित्यिक व पत्रकार (Literary and journalist) या दोघांची जबाबदारी वाढली असून, सांस्कृतिक पडझड थांबविण्याचे काम यांनीच केले पाहिजे. पत्रकार परिषदेत वार्ताहरांनी हिंदीत बोलण्याचा आग्रह धरला, की ताबडतोब हिंदीत बोलण्यास सुरुवात करणारे महाराष्ट्राचे मंत्रीच मराठीचे मारेकरी आहेत, असे मत वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी नुकतेच येथे व्यक्त केले. (The minister of Maharashtra is the killer of Marathi)

अभिनेत्री प्राजक्ता माळी (Actress Prajakta Mali) यांच्या ‘प्राजक्तप्रभा’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन फुटाणे यांच्या हस्ते झाले, या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, ग्रंथालीचे शिरीष विरकर, अक्षरधाराचे रमेश व रसिका राठिवडेकर उपस्थित होते. प्राजक्ता माळी यांनी पुण्यात प्रकाशन समारंभ होत असल्याचा आनंद व्यक्त करत, कविता कशा सुचल्या व आलेल्या अनुभवातून त्या कशा लिहिल्या, हे सांगितले. अक्षरधारा आयोजित मान्सून सेलनिमित्त हा कार्यक्रम झाला.

loading image
go to top