
पुणे : नशापाणी करण्यास मज्जाव केल्यामुळे झालेल्या भांडणाच्या रागातून लष्कर परिसरातील कचरा गोळा करणाऱ्या वृद्ध नागरिकाचा खून केल्याचे उघडकिस आले आहे. गुन्हे शाखेच्या युनीट दोनच्या पथकाने 24 तासात गुन्हा उघडकीस आणून आरोपीला बेड्या ठोकल्या.
मोहंमद आझाद सुक्कसाब शाह (वय 21, रा.मोदिखाना, लष्कर, मुळ रा.बिजनोर, उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तर इस्माईल शेख (वय 65) असे खुन झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी 6 एप्रिल रोजी लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
या प्रकरणाचा गुन्हे शाखेच्या युनीट दोनच्या पथकाकडुन समांतर तपास सुरु होता. प्रभारी पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी या गुन्हयाच्या तपासासाठी सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश मोरे व भोसले यांची दोन पथके तयार केली. या पथकाकडुन तपास सुरु होता.शेख हे कचरा गोळा आपली उपजिविका भागवित होते. त्यांचे वर्तनही व्यवस्थित असल्याचे आजुबाजुच्या लोकांनी सांगितले होते. त्यामुळे हा खुन कोणी व कोणत्या कारणासाठी केला, याचा शोध घेणे पोलिसांच्या दृष्टीने कठिण जात होते. जेथे खुन झाला, तेथून जवळच राहणारा मोहंमद आझाद शाह हा त्याचा भाऊ व वाहिनीसोबत तेथे होता, त्यास नशापाणी करण्याचे व्यसन अशी खबर पोलिस कर्मचारी मोहसीन शेख यांना मिळाली. त्यावरुन पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले.
त्याच्याकडे कसून चौकशी केली, त्यावेळी त्याने गुन्हा कबूल केला. शेख राहात असलेल्या ठिकाणी मोहम्मद हा वेळोवेळी नशापाणी करण्यासाठी जात होता. त्यास शेख यांनी तेथे नशापाणी करण्यास मज्जाव केला होता. "तू तुझ्या गावाला उत्तर प्रदेशात परत जा" असे तो बोलत होता. त्यामुळे त्याच्याविषयी मोहम्मदच्या डोक्यात राग होता. त्यामुळे त्याने 5 तारखेला रात्री शेख झोपलेले असताना त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांचा खुन केला.
अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलिस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप, सहायक पोलिस निरीक्षक वैशाली भोसले, प्रकाश मोरे, यशवंत आंब्रे, कर्मचारी किशोर वग्गु, नामदेव रेणुसे, मोहसीन शेख, उत्तम तारु, चेतन गोरे, समीर पटेल, मितेश चोरमोले, गोपाल मदने यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.