दिलासा! पुणे जिल्ह्यात नवे रुग्ण दीड हजारच्या आत

corona update
corona update

पुणे : पुण्यात लॉकडाऊन लागू केल्यानंतर पुण्यातील रुग्णांची संख्येट घट झाली असून परिस्थिती निंयत्रणात आली आहे. कोरोना बाधितांची संख्या आणि आॅक्सिजन बेड वापराचे प्रमाण थोडेसे जास्त असल्याने पुणे शहराचा समावेश दुसऱ्याऐवजी तिसऱ्या टप्‍प्यात झाला. गेल्या 24 तासात पुणे जिल्ह्यात 1398 पॉझिटव्ह रुग्ण आढळले असून एकूण रुग्ण संख्या 10,23,440 वर पोहचली आहे. यापैकी एकून 9,88,299 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहे त्यापैकी गेल्या 24 तासात 2350 रुग्ण कोरोनामुक्त झाले. पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात 36 जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकाडा 17171 वर पोहचला आहे. काल दिवसभरात एकूण 18763 रुग्णांची कोरोना चाचणी झाली तर आतापर्यंत एकूण 5147940 रुग्णांची कोरोना चाचणी झाली आहे. दरम्यान जिल्ह्यात एकूण 18139 रुग्णांवर उपाचार सूरू आहेत .

corona update
पुणे तिसऱ्या टप्यात; जाणून घ्या काय सुरु, काय बंद?

पुणे महापालिकेने १ जूनपासून शहरातील लॉकडाउनचे निर्बंध शिथिल केले आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरात 297 पॉझिटव्ह रुग्ण आढळले असून एकूण रुग्ण संख्या 4,72,254 वर पोहचली आहे. यापैकी एकून 4,59,564 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहे त्यापैकी गेल्या 24 तासात 549 रुग्ण कोरोनामुक्त झाले. पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात 16 जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकाडा 8,395 वर पोहचला आहे. काल दिवसभरात एकूण 5,668 रुग्णांची कोरोना चाचणी झाली तर आतापर्यंत एकूण 25,38,998 रुग्णांची कोरोना चाचणी झाली आहे. दरम्यान जिल्ह्यात एकूण 4295 रुग्णांवर उपाचार सूरू असून 662 रुग्णांची स्थिती गंभीर आहे.

corona update
पुण्यात आज होणार ७२ केंद्रांवर लसीकरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com