'विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात पालक आणि शिक्षकांची भूमिका महत्त्वाची

सर्वांगीण विकास होऊन भारताची पुढील उन्नत युवापिढी घडविण्यास योगदान मिळेल.
only 26 thousand students in school in ratnagiri 100 schools closed till the date
only 26 thousand students in school in ratnagiri 100 schools closed till the date

मुंढवा : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीत त्यांच्यावर संस्कार रुजवण्यासाठी शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांचा एकत्र सुसंवाद झाला तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊन भारताची पुढील उन्नत युवापिढी घडविण्यास योगदान मिळेल. असे प्रतिपादन पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपसचिव आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष एल एम पवार यांनी केले.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या खराडी येथील शंकरराव उरसळ फार्मसी महाविद्यालयात ऑनलाइन व ऑफलाइन (हायब्रीड) पद्धतीने आयोजित पालक सभेत उपसचिव पवार बोलत होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक भोसले

पदविका विभागाचे प्राचार्य अॅड. सचिन कोतवाल, प्रा विवेक इंगळे, उपप्राचार्या डॉ विजया बर्गे, प्रा. सुजित काकडे, प्रा.विपुल धसाङे,या कार्यक्रमात कोरोना संक्रमणामध्ये घ्यावयाची काळजी, त्यावरील उपाय आणि लसीकरणाचे महत्व सर्वांना कळावे या उद्देशाने विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. तसेच पालक व विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केले.सूत्रसंचालन व नियोजन प्रा. विक्रम वीर तर आभार प्रा. प्रशांत खाडे यांनी मानले. तर कार्यक्रमासाठी तांत्रिक सहाय्यक डॉ अमित कसबे यांनी सहकार्य केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com