esakal | कोरोनाची दुसरी लाट तरुणांसाठी ठरली घातक
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाची दुसरी लाट तरुणांसाठी ठरली घातक

कोरोनाची दुसरी लाट तरुणांसाठी ठरली घातक

sakal_logo
By
- गजेंद्र बडे

पुणे : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाची दुसरी लाट ही तरुणांसाठी मोठी घातक ठरली आहे. ग्रामीणमधील दुसऱ्या लाटेतील एकूण कोरोना रुग्णांपैकी तब्बल २६ टक्के रुग्ण हे वयाच्या तिशीनंतरचे आणि चाळीशीच्या आतील असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात कोरोनाची सर्वाधिक लागण ही तरुणांना झाली आहे. या वृत्ताला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दुजोरा दिला आहे.

कोरोनामुळे झालेल्या एकूण मृत्यूमध्ये सर्वाधिक मृत्यू हे ज्येष्ठ नागरिकांचे आहेत. ६१ ते ७० वयोगटातील नागरिकांचे जास्त मृत्यू झाले आहेत. शिवाय कोरोनाबाधितांचा दरही जास्त झाला आहे. पुणे शहर व पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना लाटेचा वेग कमी होत असला, तरी ग्रामीण भागात अद्यापही वेग वाढत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा: सिंहगडावर अतिक्रमण कारवाईचे संकेत; वन विभागाने कसली कंबर

राज्यातील पहिला कोरोना रुग्ण ९ मार्च २०२० ला पुणे शहरात सापडला होता.त्यानंतर पहिल्या लाटेतील रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. जानेवारी २१ पर्यंत ही पहिली लाट चालली. दरम्यान, तत्पुर्वीपासूनच म्हणजेच नोव्हेंबर२०२० पासून पहिल्या लाटेतील रुग्णसंख्या कमी होण्यास सुरवात झाली होती.फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत ही लाट बऱ्यापैकी ओसरली होती, परंतु फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून दुसरी लाट सुरू झाली. पहिल्या लाटेत ३१ ते ४० वयोगटातील २४ टक्के रुग्ण होते. दुसऱ्या लाटेत या वयोगटातील २६ टक्के रुग्ण झाले आहेत. जिल्ह्यात रुग्णबाधित दराचा आलेखही चढता राहिला आहे. पहिल्या लाटेत १९.४ टक्के असलेला दर दुसऱ्या लाटेत २३.६ टक्के इतका झाला आहे. तसेच हॉटस्पॉट गावांची संख्याही वाढली आहे. पहिल्या लाटेत २०५ हॉटस्पॉट जिल्ह्यात होते. ही संख्या आता ३९७ झाली आहे.

हेही वाचा: पाणी भरपूर का प्यावं? जाणून घ्या 12 कारणे

loading image
go to top