फुकटात टायरट्यूब बदलून दिले नाहीत म्हणून कोयत्याने वार; आरोपींना अटक

फुकटात टायरट्यूब बदलून दिले नाहीत म्हणून कोयत्याने वार; आरोपींना अटक

पुणे : टायर पंक्चरच्या दुकानात दुचाकी गाडीसाठी फुकटात टायर व ट्यूब बदलून दिली नाही, याचा राग आल्याने चौघांनी दुकानातील तरुण व मालकावर कोयत्याने वार करण्याबरोबरच लाकडी दांडक्‍याने मारहाण केली. ही घटना गुरुवारी सायंकाळी सात वाजता रामटेकडी येथील रामनगरमध्ये घडली. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी दोघांना अटक केली. अक्षय मंहेद्र शिंदे, अजय महेंद्र शिंदे (दोघे, रा.आदिनाथ सोसायटी, रामटेकडी) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह त्यांच्या तीन ते चार साथीदारांवर खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी जावेद अन्सारी (वय 26,रा.हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेहमत कुरेशी यांचे रामटेकडी येथील रामनगर परिसरात "सय्यद टायर वर्क्स" नावाचे वाहनाच्या टायरचे पंक्चर काढाण्याचे दुकान आहे. त्यांच्याकडे फिर्यादी काम करतात. गुरुवारी सायंकाळी सात वाजता फिर्यादी

फुकटात टायरट्यूब बदलून दिले नाहीत म्हणून कोयत्याने वार; आरोपींना अटक
रात्रीच्या वेळी घराची खिडकी उघडी ठेवणे पडले महागात; 3 लाखांचा ऐवज लंपास

टायरच्या दुकानात असताना अक्षय व अजय तेथे आले. त्यांनी गाडीचा टायर व ट्यूब फुकट बदलून देण्यास सांगितले. मात्र फिर्यादी जावेद व रेहमत यांनी त्यास नकार दिला. याचा राग मनात धरुन त्यांनी फिर्यादी जावेद व रेहमतला लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. दरम्यान, ही भांडणे सोडवण्यासाठी आलेल्या इरफान नावाच्या युवकालाही "आज तुला खल्लास करतो" असे म्हणत जवळील कोयत्याने डोक्‍यात वार केला. यामध्ये इरफान गंभीर जखमी झाला. यानंतर अजयने त्याच्या हातातील लाकडी दांडक्‍याने जावेदवर हल्ला केला. त्यांच्यासोबत असलेल्या मुलांनी दगड फेकून मारले, यामध्ये रेहमत यांना दगड लागून ते जखमी झाले. जाताना अक्षयने हातातील कोयता फिरवत "आमच्या नादाला लागाल तर एकेकाचे मुडदे पाडू" असे म्हणत दहशत माजवली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक विष्णू वाडकर करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com