Pune : शिक्षणासाठी वाढतोय ‘स्मार्टफोन’चा वापर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mobile

शिक्षणासाठी वाढतोय ‘स्मार्टफोन’चा वापर

पुणे : कोरोनामुळे गेल्या वर्षी शाळा बंद झाल्या आणि ऑनलाइन शिक्षण सुरू झाले. त्यामुळे घरोघरी स्मार्टफोन पोचल्याचे चित्र आहे. ‘असर’ अहवालात विद्यार्थी असणाऱ्या घरांमध्ये स्मार्टफोनच्या संख्येत २०१८ च्या तुलनेत २०२१ मध्ये दुप्पट वाढ झाली. असे असले तरी घरामध्ये स्मार्टफोन असूनही तब्बल २६.१ टक्के विद्यार्थ्यांना तो शिक्षणासाठी उपलब्ध होऊ शकला नसल्याची माहिती समोर आली.

कोरोना काळात मुलांच्या शिक्षणाला ‘ब्रेक’ लागू नये, म्हणून घरोघरी स्मार्टफोन पोचला, परंतु असे असतानाही काही मुलांना शिक्षणासाठी स्मार्टफोनचा पुरेसा वापर करता आला नसल्याची माहिती समोर आली आहे. प्रथम फाउंडेशनकडून दरवर्षी शालेयस्तरावरील शैक्षणिक स्थितीची पाहणी केली जाते आणि त्याआधारे ‘असर’ हा अहवाल प्रकाशित केला जातो. २०२१ या वर्षांचा हा अहवाल प्रकाशित झाला. २०१८ मध्ये सरकारी शाळांमधील केवळ २९.६ टक्के विद्यार्थ्यांच्या घरी स्मार्ट फोन होता. आता हीच संख्या २०२० मध्ये ५६. ४ टक्के, तर २०२१ मध्ये ६३.७ टक्क्यांपर्यंत पोचली आहे. देशभरातील ६७.६ टक्के विद्यार्थ्यांकडे घरी किमान एक स्मार्टफोन उपलब्ध आहे.

loading image
go to top