आळेफाटा - पूर्वी अंगावर पांघरण्यासाठी घोंगडीचा वापर होत होता. काळानुसार त्यात बदल होत गेले आणि आज घोंगडी ही काय असते, ती कशापासून बनते यांची साधी माहितीही आजच्या पिढीला नाही..आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात ही कला लोप पावत आहे. मूळचे इंदापूर येथील गिरीश निकम यांचे शिक्षण दहावीपर्यंत झालेले. घोंगडी बनवून विक्रीचा त्यांचा पिढीजात व्यवसाय आहे. गेली ४० हुन अधिक वर्षांपासून ते ही परंपरा जपत आहेत. आज ते दुचाकीवरून गावोगावी जाऊन घोंगडी विकण्याचे काम करतात.मेंढपाळ आपल्याजवळ असलेल्या मेंढ्यांच्या अंगावरील कातर काढतात. त्यानंतर काळी व पांढरी लोकर वेगळी केली जाते. त्यानंतर चरख्यावर त्यापासून सूत तयार होते. सुताला चांगला पीळ, मजबुती यावी आणि घोंगडी विणायला सोपे जावे यासाठी त्याला रात्रभर चिंचोक्यांच्या खळीमध्ये भिजत ठेवले जाते..त्यामध्ये हळद आणि आयुर्वेदिक वनस्पतींचा अर्क टाकला जातो. साधारणपणे एक घोंगडी विणायला दोन ते तीन दिवस लागतात. पूर्वी १० ते १२ फूट लांबीची घोंगडी विणली जात होती. आता ग्राहकांच्या मागणीनुसार हवी, अशी बनवून दिली जाते. एक किलो लोकर २९ ते ३२ रुपयांना पडते.तसेच, एक घोंगडी विणायला ६ ते ८ किलो लोकर लागते. एक घोंगडी ७०० ते ५००० रुपयांपर्यंत विकली जाते. यांची विक्री ते स्वतः: पुणे, सातारा, सांगली कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर आणि राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांत तेथील आठवडे बाजार, जत्रा, कृषी खात्यामार्फत भरविलेल्या प्रदर्शनात विक्री करतात..शारीरिक थकवा कमी करण्यास मदतपूर्वीच्या काळात ग्रामीण भागातील प्रत्येक घराघरांत घोंगडीचा वापर केला जात होता. काळानुसार बदल होत गेल्याने याचा वापर कमी झाला. त्याची जागा आज ब्लॅंकेट, बेडशीट यांनी घेतली. याशिवाय, वजनाला जड व अंगाला थोडीशी टोचत असल्याने ही घोंगडीची मागणी कमी झाली आहे; परंतु आज घोंगडीला शहरी भागातून मोठी मागणी आहे.घोंगडीचा वापर केल्यास पाठदुखी, कंबरदुखी, वात, सांधेदुखी यांपासून आराम मिळतो. तसेच, झोप येत नसणाऱ्यांसाठी हे एक उत्तम आरामाचे साधन आहे. घोंगडीवर झोपल्याने शांत झोप लागते. उच्च रक्तदाब नियंत्रणात येण्यास मदत होते..कांजिण्या, गोवर, तापातही घोंगडीचा वापर करतात. लहान मुलांचा अस्थमा दूर होतो. अर्धांगवायूचा धोका टळतो, मधुमेह कमी होण्यास मदत होते. घोंगडीवर झोपल्याने साप, विंचू, मुंगी, गोम, मधमाशा, ढेकूण जवळ येत नाहीत, अशी माहिती निकम यांनी सांगितले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.