Pune : पाणीप्रश्नाच्या पाठींब्यासाठी केला जातोय लग्नपत्रिकेचा वापर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाणीप्रश्नाच्या पाठींब्यासाठी केला जातोय लग्नपत्रिकेचा वापर

पाणीप्रश्नाच्या पाठींब्यासाठी केला जातोय लग्नपत्रिकेचा वापर

पारगाव : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लोणी, धामणी, पहाडदरा, शिरदाळे, खडकवाडी, वडगावपीर, मांदळेवाडी, रानमळा या गावातील पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून हि गावे दुष्काळी गावे म्हणून ओळखली जातात पाणीप्रश्नावर या गावातील नागरिक आक्रमक झाली आहे महिन्यापूर्वी लोणी येथे श्री म्हाळसाकांत पाणी संघर्ष कृती समिती स्थापन करून या भागाला डिंभे धरणाचे पाणी अर्थातच आपल्या हक्काचे पाणी मिळावे यासाठी लढा उभारला आहे. या लढ्याला व्यापक स्वरूप प्राप्त होण्यासाठी पहाडदरा येथील उद्योजक विठ्ठल वीर यांनी आपल्या मुलाच्या लग्न पत्रिकेमध्ये आंदोलनाचा फोटो छापून या संघर्ष लढ्यामध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आव्हान केले त्यामुळे हि लग्न पत्रिका परिसरामध्ये चर्चेचा विषय बनली आहे

पाणी प्रश्नावर स्थापन झालेल्या श्री म्हाळसाकांत पाणी संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून लोणी येथे जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.पूर्व भागातील लोणी, धामणी, वडगावपीर, मांदळेवाडी, शिरदाळे, रानमळा,खडकवाडी, पहाडदारा ही आठ गावे ही डिंभे धरणाच्या पाण्यापासून कायमस्वरूपी वंचित राहिलली आहेत.

अपुरा पाऊस ,पाण्याचा कुठल्याही प्रकारचा स्रोत नसल्यामुळे दुष्काळ हा कायम ह्या गावांच्या पाचवीला पुजलेला आहे, दोन महिन्यापूर्वी या आठ गावातील सर्व तरुणांनी एकत्र येऊन पक्षविरहीत म्हाळसाकांत पाणी संघर्ष कृती समिती उभारून या भागाला डिंभे धरणाचे पाणी अर्थातच आपल्या हक्काचे पाणी मिळावे यासाठी लढा उभारला आहे. त्यासाठी विविध प्रकारची आंदोलने, उपोषण आणि लोकप्रतिनिधींना निवेदनही देण्यात आली.

परंतु आता कुठेतरी या परिसरातील सामान्य जनता आपल्या पाण्याच्या प्रश्नासाठी जागी होताना दिसत आहे, त्यामुळे उद्योजक विठ्ठल वीर यांनी आपल्या मुलाच्या लग्न पत्रिकेमध्ये आंदोलनाचा फोटो छापून या संघर्ष लढ्यामध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आव्हान करत आपला पाठिंबा दर्शवला आहे.ही आगळी वेगळी लग्न पत्रिका तालुक्यात चर्चेचा विषय ठरली असून शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी वीर यांनी लढवलेल्या शक्कलचे परिसरातून कौतुक होत आहे.

loading image
go to top