शंभर रुपयांच्या कुलपापायी २६ हजारांचा ऐवज गमावला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 डिसेंबर 2018

मंचर - कुलूप हरवल्याने गुरुवारी (ता. २७) रात्री दरवाजाला फक्त कडी लावून सुरक्षारक्षक कामावर गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी घरी येऊन पाहतो तर घरातून लॅपटॉप आणि रोख ११ हजार रुपये असा एकूण २६ हजार रुपयांचा ऐवज लंपास होता. केवळ शंभर रुपयांचे नवे कुलूप आणून बसविण्यास कंटाळा केल्याने तो २६ हजारांच्या ऐवजास मुकला.  

येथील मुळेवाडी रस्त्यावर भरवस्तीत असलेल्या विजय पार्क या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सदनिका क्रमांक १०१ मध्ये हृषीकेश राजेंद्र भोसले राहतात. ते शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. रात्रीच्या वेळी ते हॉटेलवर सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. त्यांच्या दरवाजाचे कुलूप हरवले होते, त्यामुळे कडी लावून ते खेड घाटाजवळ असलेल्या आस्वाद हॉटेलवर रात्रीच्या सुरक्षेसाठी निघून गेले. 

शुक्रवारी (ता. २८) सकाळी दरवाजा उघडल्यानंतर काळ्या लॅपटॉप, चार्जर, अकरा हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेल्याचे आढळले. भोसले यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.

Web Title: Theft Crime