केडगावात चोरट्यांनी चार सदनिका फोडल्या; १०० नंबरऐवजी गुगल आले मदतीला

केडगावात चोरट्यांनी चार सदनिका फोडल्या; १०० नंबरऐवजी गुगल आले मदतीला

केडगाव (पुणे) : केडगावात एकाच रात्री सहा बंद सदनिका फोडून चार दिवस झाले नाही, तोच चोरट्यांनी आज पुन्हा आनंद हेरिटेज हाउसिंग सोसायटीत पहाटे चार बंद सदनिका फोडल्या. या प्रकारामुळे केडगावच्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. १०० नंबरचा फोन उचलला न गेल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

केडगाव (ता. दौंड) येथे गेल्या गुरूवारी जवाहरलाल विद्यालयाशेजारी चोरट्यांनी सहा बंद सदनिका फोडल्या. ही घटना ताजी असतानाच आज पहाटे तेथून एक किलोमीटरवरील आनंद हेरिटेजमधील (बोरीपार्धी) बी, सी व डी इमारतीतील डॅा. प्रतिक गोरे, बीएसएनलचे अधिकारी अंकुर वर्मा, डॅा. अमोल बिरुंगुले व मुकेश खंडाळे यांच्या बंद सदनिकेमध्ये चोऱ्या झाल्या आहेत. केडगावात चोरट्यांनी पोलिसांना एक प्रकारचे आव्हानच दिल्याची तक्रार ग्रामस्थ करीत आहेत. 

डी इमारतीतील मुकेश खंडाळे यांचा मजबूत दरवाजा चोरट्यांनी सहज उटकटून आत प्रवेश केला. कपाटातील अर्धा तोळे सोने व कपाटातील १५ साड्या चोरून नेल्या. टीव्ही खोलण्याचा प्रयत्न केला मात्र, टिव्ही ब्रॅकेटमधून न निघाल्याने तो वाचला. याच घरात चोरट्यांनी डब्यांमधील चिवडा व लाडू खाल्ले. डी इमारतीतील चौथ्या मजल्यावरील सर्व सदनिकांना चोरट्यांनी बाहेरून कड्या लावल्या होत्या.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बी इमारतीतील डॅा. गोरे व डॅा. बिरूंगुले हे रात्रपाळीला दवाखान्यात असल्याने घरी कोणी नव्हते. त्यांच्या दोन्ही सदनिका फोडल्या. मात्र, चोरट्यांच्या हाती तेथे काही लागले नाही. सी इमारतीतील बीएसएनएलचे उपअभियंता अंकुर वर्मा हे गुजरातला गेले असल्याने त्यांची सदनिका बंद होती. त्या सदनिकेत प्रवेश करत चोरट्यांनी डल्ला मारला आहे. इमारतीचे वॅाचमन विजय अढागळे यांनी संशयास्पद हालचालींबद्दल इमारतीमधील काही जणांना कळविले होते. मात्र, रहिवाशांकडून तातडीने योग्य प्रतिसाद मिळाला नाही, तोपर्यंत चोरट्यांनी चार सदनिका फोडल्या. चोरटे लाल रंगाच्या स्वीफ्ट गाडीतून आल्याचे सीसीटिव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसत आहे. ग्रामस्थांनी दोन दुचाकीवरून केडगाव टोलनाक्यापर्यंत चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. 

...अन् गुगल आले मदतीला

चोरी झाल्यानंतर आनंद हेरिटेजमधील रहिवासी पिसाळ यांनी १०० नंबरवर फोन लावला. मात्र, फोन उचलला गेला नाही. पिसाळ हे दीड तास या नंबरवर संपर्क करत होते. अखेर त्यांनी गुगलवर सर्च करून यवत पोलिस ठाण्याचा नंबर शोधून पहाटे पाच वाजता संपर्क साधला. पोलिस साडेपाचला घटनास्थळी दाखल झाले. केडगाव पोलिस चौकीशीही संपर्क होत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या इमारतीतील रहिवाशांना ग्रामसुरक्षा अॅपबद्दल काहीही माहिती नसल्याचे रहिवाशांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com