esakal | माजी आमदार रामभाऊ मोझे यांच्या पुतण्यांच्या घरात चोरी
sakal

बोलून बातमी शोधा

pune

माजी आमदार रामभाऊ मोझे यांच्या पुतण्यांच्या घरात चोरी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : माजी आमदार रामभाऊ मोझे यांच्या पुतण्यांच्या घरात घुसत चोरट्यांनी एक किलो सोन्याच्या दागिन्यांसह ५३ लाख ४६ हजार रुपयांचा ऐवज चोरला आहे. तीन ते पाच सप्टेंबर दरम्यान येरवडा येथे ही चोरी झाली.

या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात हरिश्चंद्र ऊर्फ राजू मनोहर मोझे (वय ४९, रा. संगमवाडी) यांनी चोरट्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. माजी आमदार रामभाऊ मोझे यांचे पुतणे राजू मोझे व त्यांचा भाऊ मोहन मोझे हे कुटुंबासमवेत कामानिमित्त तीन ते पाच सप्टेंबर दरम्यान बाहेरगावी गेले होते.

याकाळात त्याचे घराचा दरवाजा कुलूप लावून बंद करण्यात आला होता. मोझे कुटुंबीय घरात नसल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर राजू मोझे यांच्या बेडरूममधील कपाटातील लॉकर तोडून त्यातील ४० लाख २० हजार रुपयांचे सोन-चांदीचे दागिने, महागडी घड्याळे चोरली. तर मोहन मोझे यांच्या घरातील लॉकरमधून १३ लाख २६ हजार रुपये किमतीचे दागिने व रोकड चोरली.

फिर्यादी हे बाहेर गावावरून आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याबाबत माहिती मिळताच, येरवडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जागेचा पंचनामा करत चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत येरवडा पोलिस पुढील तपास करत आहे.

loading image
go to top