पुणे : बाहेर गावी गेलेल्या कुटुंबाच्या घरात चोरी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

श्रावणानिमित्त बाहेरगावी गेलेल्या एका नागरिकाच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी एक लाख 15 हजार रुपयांची रोकड व सोने-हिऱ्याचे दागिने असा तब्बल चार लाख 82 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला. ही घटना एरंडवणा परिसरामध्ये रविवारी पहाटे घडली. 

पुणे : श्रावणानिमित्त बाहेरगावी गेलेल्या एका नागरिकाच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी एक लाख 15 हजार रुपयांची रोकड व सोने-हिऱ्याचे दागिने असा तब्बल चार लाख 82 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला. ही घटना एरंडवणा परिसरामध्ये रविवारी पहाटे घडली. 

याप्रकरणी शेखर तेंडुलकर (वय 56, रा. एरंडवणा, कर्वेनगर) यांनी अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिस उपनिरीक्षक एस.के.गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांच्या पत्नी श्रावणातील धार्मिक कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी गेले होते.
दरम्यान, रविवारी सकाळी त्यांच्या घराचा मुख्य दरवाजाचे कुलूप कशाच्या तरी सहाय्याने तोडून घरामध्ये चोरी केल्याच्या शेजाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यानुसार त्यांनी तत्काळ तेंडुलकर यांना याबाबत खबर दिली. त्यानंतर तेंडुलकर यांनी तातडीने माघारी येऊन याबाबत अलंकार पोलिसांना खबर दिली.

चोरट्यांनी फिर्यादी तेंडुलकर यांच्या घरात प्रवेश करुन त्यांच्या बेडरूममधील कपाटातील एक लाख 15 हजार रुपयांची रोकड व सोने-हिऱ्याचे दागिने असा तब्बल चार लाख 82 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft at the House while family went outside Pune