esakal | "ईडी'ने जप्त केलेल्या "डिएसकें'च्या बंगल्यातुन 7 लाखांच्या वस्तुंची चोरी | Pune
sakal

बोलून बातमी शोधा

dsk

"ईडी'ने जप्त केलेल्या "डिएसकें'च्या बंगल्यातुन 7 लाखांच्या वस्तुंची चोरी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : ठेवीदारांच्या फसवणुकीप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केलेल्या बांधकाम व्यावसायिक डि.एस.कुलकर्णी यांच्या बंगल्यात घुसून चोरट्यांनी बंगल्यातील सात लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला. हि घटना सेनापती बापट रस्त्यावरील "डिएसके' यांच्या बंगल्यात घडली.

याप्रकरणी डि.एस.कुलकर्णी यांची स्नुषा भाग्यश्री कुलकर्णी यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ऑक्‍टोबर 2019 ते ऑक्‍टोबर 2021 कालावधीत घडली. ठेवीदारांची फसवणूक करून आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी कुलकर्णी, त्यांच्या पत्नीसह काही जणांना आर्थिक गुन्हे शाखेने चार वर्षांपुर्वी अटक केली होती.

त्यानंतर त्यांची रवानगी कारागृहात केली होती. त्यानंतर "ईडी'नेही त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचा सेनापती बापट रस्ता येथील "सप्तशृंगी' बंगला जप्त केला. तेव्हापासून संबंधीत बंगला बंद आहे. दरम्यान, चोरट्यांनी बंगल्यामध्ये घुसून चोरी केल्याची माहिती फिर्यादी भाग्यश्री कुलकर्णी यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी "ईडी'शी पत्रव्यवहार करून त्यांना याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी पंचांसह संबंधीत बंगल्याची पाहणी केली. तेव्हा, टिव्ही, गिझर व इलेक्‍ट्रॉनिक वस्तु अशा सात लाख रुपयांच्या वस्तु त्यांनी चोरुन नेल्या. ईडीने पोलिसांना पत्र लिहून तपासाचे आदेश दिले आहेत.

loading image
go to top