ओझरच्या विघ्नहर गणपती मंदिरात चोरी; दिड किलोची चांदीची छत्री केली लंपास

अमोल थोरवे
Tuesday, 28 July 2020

या घटनेत मंदिराच्या गाभाऱ्यातील गणेशमूर्तीच्यावरची अंदाजे दिड किलो वजनाची चांदीची छत्री चोरटयांनी लंपास केली तसेच गाभाऱ्यातील एक तिजोरी पळविण्याचा प्रयत्न केला. तिजोरी फोडून त्यातील रक्कम काढून घेऊन ती मंदिराच्या बाहेर फेकून चोरटे पळून गेले. ​

ओझर : अष्टविनायकातील तिर्थक्षेत्र ओझर (ता.जुन्नर) येथील विघ्नहर गणपती मंदिरात पहाटे दोनच्या सुमारस चोरी करून चोरट्यांनी पोबारा केला. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यामध्ये दोन अज्ञात चोरटे असल्याचे दिसून येते.

सरकारी कर्मचारी बदल्या रद्दचा 'नांदेड-लातूर पॅटर्न' पुण्यात राबवा​

या घटनेत मंदिराच्या गाभाऱ्यातील गणेशमूर्तीच्यावरची अंदाजे दिड किलो वजनाची चांदीची छत्री चोरटयांनी लंपास केली तसेच गाभाऱ्यातील एक तिजोरी पळविण्याचा प्रयत्न केला. तिजोरी फोडून त्यातील रक्कम काढून घेऊन ती मंदिराच्या बाहेर फेकून चोरटे पळून गेले.

पुण्याच्या महापौरांनी राज्य सरकारकडे केल्या 'या' मागण्या; वाचा सविस्तर

एप्रिल महिन्यात तिजोरीतील रक्कमेची मोजदात करण्यात आली होती. कोरोनाच्या संसर्गामुळे गेली चार महिन्यांपासून मंदिर बंद असल्याने तिजोरीत फारशी रक्कम नसावी अशी माहिती विघ्नहर गणपती देवस्थानचे अध्यक्ष बी.व्ही. मांडे यांनी दिली. या घटनेचा अधिकचा तपास ओतूर पोलिस करत आहेत.
 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: theft at Ozar Vighnahar Ganpati temple