गावातही उत्पन्नाच्या खूप संधी -  डॉ. अनिल काकोडकर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 डिसेंबर 2019

आपल्या गावातही उत्पन्नाच्या खूप संधी आहेत, ही कल्पना शिक्षणाच्या मदतीने ग्रामीण भागात रुजली; तर देशातील शहरी व ग्रामीण अशी निर्माण झालेली दरी आपोआपच दूर होईल,’’ अशी अपेक्षा  ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केली.

माळेगाव- ‘‘शिक्षण व संशोधनाच्या संधी अमेरिकेतच नाहीत, आपल्या गावातही उत्पन्नाच्या खूप संधी आहेत, ही कल्पना शिक्षणाच्या मदतीने ग्रामीण भागात रुजली; तर देशातील शहरी व ग्रामीण अशी निर्माण झालेली दरी आपोआपच दूर होईल,’’ अशी अपेक्षा राजीव गांधी सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी आयोगाचे अध्यक्ष व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केली.

शारदानगर येथे सायन्स अँड इनोव्हेशन ॲक्‍टिव्हिटी सेंटरची उभारणी करण्यात येणार आहे. त्याच्या भूमिपूजनप्रसंगी ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार, होमी भाभा सायन्स सेंटरचे के. सुब्रम्हण्यम, आदी उपस्थित होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सुळे म्हणाल्या, ‘‘इनोव्हेशनच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान येत असले, तरी त्याचा लोकांच्या रोजगारावर विपरीत परिणाम होणार नाही, याची काळजी घेतली जावी.’’ 

जिज्ञासू वृत्तीला मदत - शरद पवार
शरद पवार म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांतून नवसंशोधक निर्माण व्हावेत, प्रयोगशीलता वाढावी व संशोधकवृत्तीला प्रोत्साहन मिळावे, यासाठी या सेंटरची उभारणी होते आहे. सेंटर ऑफ एक्‍सलन्स, सायन्स किट वाटप, सायकल वाटप, आदींद्वारे परिवर्तनाचा प्रयत्न आहे. आगामी काळात विद्या प्रतिष्ठान, शिवनगर शैक्षणिक संकुल व सोमेश्‍वर संकुलातील इंजिनिअरिंगच्या शिक्षक व विद्यार्थ्यांना एकत्र आणून नवीन काहीतरी करण्याचा मानस आहे. परिस्थिती भाषणे करून बदलत नाही, त्यासाठी जिज्ञासू वृत्तीला मदत करण्याची तयारी हवी, ती करण्याचे आम्ही ठरवले आहे.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There are many income opportunities in the village says Anil Kakodkar