Dahihandi Utsav : दहीहंडी उत्सवातील जाहिरातींना शुल्क सवलत नाही - आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले

आगामी गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांकडून उभारण्यात येणाऱ्या स्वागत कमानी, रनिंग कमानींवरील जाहिरातींना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
Dahihandi Utsav : दहीहंडी उत्सवातील जाहिरातींना शुल्क सवलत नाही - आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले
Updated on

पुणे - आगामी गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांकडून उभारण्यात येणाऱ्या स्वागत कमानी, रनिंग कमानींवरील जाहिरातींना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. पण रस्ते, पादचारी मार्गावर अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने जाहिराती लावू नयेत. तसेच दहीहंडी उत्सवातील जाहिरातींना शुल्कात सवलत नसल्याचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्पष्ट केले.

गणेशोत्सवातील खर्च भागविण्यासाठी मंडळांकडून मोठ्या प्रमाणात जाहिराती घेतल्या जातात. त्यासाठी मंडळाच्या परिसरात जाहिरात कमानी लावल्या जातात. या जाहिरात कमानींबाबत महापालिकेकडे नागरिकांकडून तक्रारी केल्या जातात. त्या पार्श्‍वभूमीवर आज महापालिकेने बैठक आयोजित करण्यात आली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com