रानडे इन्स्टिट्यूटबाबत एकतर्फी निर्णय नाही; उदय सामंत

रानडे इन्स्टिट्यूट बाबत एकतर्फी निर्णय घेणार नाही, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.
Uday Samant
Uday SamantSakal

पुणे - रानडे इन्स्टिट्यूट (Ranade Institute) बाबत एकतर्फी निर्णय (Decision) घेणार नाही, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. यासंबंधी ते शनिवारी (ता. १४) विविध घटकांशी संवाद साधणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सज्ञापन व वृत्तविद्या विभाग अर्थात रानडे इन्स्टिट्यूटचे विद्यापीठातील माध्यम व सज्ञापन अभ्यास विभागात विलीनीकरण करण्यात येणार आहे. इन्स्टिट्यूटच्या विलीनीकरणाच्या प्रस्तावावर माजी विद्यार्थी, विद्यार्थी संघटना आणि काही पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Uday Samant
इंजिनिअरिंग च्या दुसऱ्या वर्षाला ऍडमिशन मिळेल का? विद्यार्थ्यांना चिंता

यासंबंधी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांना विविध संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. रानडे इन्स्टिट्यूटच्या वादाबद्दल बोलताना सामंत यांनी सर्व घटकांशी संवाद साधणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ते म्हणतात, ‘‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पत्रकारितेच्या अभ्यासक्रमातील नामांकित संस्था ‘रानडे इन्स्टिट्यूटचे’ स्थलांतर करू नये, अशी युवासेनेच्या वतीने मागणी केली आहे. यासंबंधी मी स्वतः शनिवारी रानडे इन्स्टिट्यूट पुणे येथे भेट देणार आहे.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com