भाडेकरूंची नोंदणी न करणाऱ्यांवर पोलिस कारवाई नाहीच

Police
Police

पिंपरी - भाडेकरूची नोंदणी न करणाऱ्या घरमालकाविरुद्ध तरतूद असूनही मागील वर्षात एकही कारवाई झालेली नाही. पोलिसांनी तपासणी मात्र जोरात केल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. अशा घरमालकांवर कधी कारवाई करणार, असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे.

सुरक्षिततेच्या दृष्टीने घरमालकाने भाडेकरूची नोंदणी करणे बंधनकारक आहे. अशी नोंदणी झाली आहे की नाही, यासाठी पोलिसांकडून आयुक्तालयाच्या हद्दीतील १५ पोलिस ठाण्यांतर्गत वर्षभरात चार हजार १० घरे तपासण्यात आली. जे भाडेकरू राहतात त्यापैकी कोणी संशयित आहेत का, यासाठी तीन हजार ५३२ घरांची तपासणी करण्यात आली. या भाडेकरूंची नोंदणी झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र, अद्यापही अनेक भाडेकरूंची नोंदणी नाही. अशा भाडेकरूंची शोध मोहीम पोलिस कधी राबविणार, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

पोलिस आयुक्तालयांतर्गत पिंपरी-चिंचवड शहरासह हिंजवडी, तळेगाव, चाकण या भागाचा समावेश आहे. यामध्ये औद्योगिक क्षेत्र मोठे असून, कंपन्यांची संख्याही अधिक आहे. यासह आयटी हबही असल्याने अनेक जण रोजगाराच्या शोधात येथे येतात. यामध्ये परराज्यातील व्यक्तींचाही समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com