
दरम्यान, हवेलीचे नांदेड सिटी पोलिस ठाणे होईल. पण उर्वरित पोलिस ठाण्याच्या बाबतीत 'अद्याप असा कोणताही प्रस्ताव नाही.' असे पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी सांगितले.
खडकवासला (पुणे) : हवेली आता नांदेड सिटी पोलिस ठाणे होऊन शहर आयुक्तालयात जोडले जाणार आहे. हवेली पूर्ण जोडणार की विभाजन होणार, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. परंतु पोलिस ठाण्यात सध्या अवघी १७ गावं आहेत. त्यापैकी, सहा गाव शहर आयुक्तालयात जोडली जातील. उर्वरीत 11 गाव व वेल्हे, मुळशी तालुक्यातील 39 गावे जोडून 50 गावचे नवीन खानापूर पोलिस ठाणे होईल, अशी चर्चा सुरु आहे.
पुण्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
दरम्यान, हवेलीचे नांदेड सिटी पोलिस ठाणे होईल. पण उर्वरित पोलिस ठाण्याच्या बाबतीत 'अद्याप असा कोणताही प्रस्ताव नाही.' असे पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी सांगितले. हवेली पोलिस ठाण्याच्या हद्दीत सध्या खडकवासला, किरकटवाडी, नांदेड, नांदोशी, गोऱ्हे बुद्रुक, डोणजे, घेरा सिंहगड, गोऱ्हे खुर्द, खानापूर, मणेरवाडी, मालखेड, वरदाडे, खामगाव मावळ, सोनापूर, आंबी, मांडवी खुर्द, आगळंबे या गावांचा समावेश आहे, अशी १७ गावं आहेत. त्याचबरोबर, जल आयोग, केंद्रीय जल व विद्युत संशोधन संस्था, प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था, खडकवासला धरण आणि त्याचे 23 किमीचे पाणलोट क्षेत्र, सिंहगड, पानशेत, वरसगावकडे जाणारा रस्ता याचा समावेश आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
या 17 गावांपैकी नांदेड, किरकटवाडी, नांदोशी, खडकवासला, ही चार गावं नांदेड सिटी पोलिस ठाण्याला तर आगळंबे व मांडवी खुर्द ही दोन गावं उत्तमनगर पोलिस ठाण्याला जोडणार आहेत. ही सहा गावं शहर आयुक्तालयात जोडले जाणार आहे. उर्वरित गोऱ्हे बुद्रुक, डोणजे, घेरा सिंहगड, गोऱ्हे खुर्द, खानापूर, मणेरवाडी, मालखेड, वरदाडे, खामगाव मावळ, सोनापूर, आंबी ही गावं 11 गावं शिल्लक राहतात. त्यासह पानशेत धरण परिसरातील 39 गावं जोडून हवेली पोलिस ठाणे करण्याचे नियोजन केले आहे, अशी चर्चा रंगली आहे.
हवेली पोलिस ठाण्यात सध्या अवघी 17 गावं आहेत. त्या गावांची लोकसंख्या फार कमी आहे. परिणामी ग्रामीण पोलिस दलाकडून येथील अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या पूर्वीच कमी केली आहे. परिणामी त्याचा तोटा येथील नागरिकांना होतो. 11 गावं राहिल्यावर आणखी कर्मचारी कमी होईल.
शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे करून गुन्हेगार शहरालगत असलेल्या ग्रामीण पोलिस दलाच्या हद्दीत येऊन फरार होतात. अशा वेळी शहर पोलिसांना तपास कामात अडचण होते. हद्दीलगत असलेल्या अनेक पोलिस अधिकारी विविध गुन्ह्याच्या तपासात माहिती देताना सांगतात. शहर पोलिस कमी वेळेत (क्विक रीस्पॉन्स टाइम) घटनास्थळी पोलिस पोचतात. या पार्श्वभूमीवर हवेली पोलिस ठाणे पुणे शहर पोलिस दलाला जोडल्यास गावांच्या विकासाबरोबरच कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होणार आहे