भामा-आसखेडचे पाणी मिळणार

Bhama-aaskhed-water
Bhama-aaskhed-water

पिंपरी - भामा-आसखेड प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना मोबदल्यापोटी महापालिकेने आतापर्यंत वीस कोटी रुपये दिले आहेत. उर्वरित दहा कोटी लवकरच दिले जाणार आहेत. शिवाय, दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीतही शेतकऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे भामा-आसखेड धरणाचे पाणी जलवाहिनीद्वारे शहरात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सध्या पवना धरणातून पाणीपुरवठा होत आहे. त्यासाठी पवना नदीवरील रावेत येथील बंधाऱ्यातून प्रतिदिन ४८० दशलक्ष लिटर (एमएलडी) अशुद्ध जलउपसा केला जात आहे. शिवाय, एमआयडीसीकडून महापालिका प्रतिदिन ३० एमएलडी पाणी विकत घेत आहे.

मात्र, शहराची वाढती लोकसंख्या व भविष्याचा विचार करून वाढीव पाणी कोटा देण्याची मागणी महापालिकेने राज्य सरकार व जलसंपदा विभागाकडे केलेली होती. त्यानुसार आंद्रा व भामा-आसखेड धरणातून अनुक्रमे १०० व १६७ एमएलडी पाणी कोटा मंजूर झालेला आहे. आंद्रातील पाणी इंद्रायणी नदीतून देहू-तळवडेपर्यंत आणायचे. तिथे बांध बांधून अशुद्ध जलउपसा करायचा, असे नियोजन आहे. त्यानुसार काम सुरू झालेले आहे. मात्र, भामा-आसखेडचे पाणी जलवाहिनीद्वारे आणायचे आहे. त्यासाठी नवलाख उंब्रे गावालगत प्रकल्प उभारून पाणी आणायचे नियोजन आहे. या दोन्ही योजनांसाठी चिखलीत तीनशे एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याच्याही नियोजन आहे. तूर्तास आंद्रा योजनेसाठीच्या शंभर एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. दरम्यान, भामा-आसखेडचे पाणी नेण्यास स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केलेला होता. त्यामुळे ही योजना व त्याचे पाणी शहराला मिळण्यास विलंब होण्याची शक्‍यता निर्माण झाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com