लॉकडाउनमध्ये शेतीच्या कामांसाठी आहेत हे नियम व अटी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 जुलै 2020

दहा दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर केला आहे. मात्र, सध्या खरिप हंगामाच्या कामांसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. त्यामुळे शेतीच्या कामांमध्ये

पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड शहर आयुक्तालय आणि पुणे जिल्ह्यातील काही भागामध्ये सोमवारपासून (ता. 13) मध्यरात्री बारा वाजल्यापासून दहा दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर केला आहे. मात्र, सध्या खरिप हंगामाच्या कामांसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. त्यामुळे शेतीच्या कामांमध्ये सलवत देणार असल्याची घोषणा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केली. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे, पिंपरी चिंचवड शहर व जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रंचड वेगान वाढणारा कोरोना आटोक्यात आणण्यासाठी येत्या सोमवारी मध्यरात्रीपासून (ता. 13) संपूर्ण कडकडीत लॉकडाउन करणार असल्याची घोषणा आज दुपारी 4 वाजता ऑनलाईन पत्रकार परिषदेत विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर यांनी केली. लाॅकडाउनच्या काळात दूध, औषधे व अत्यावश्यक सेवा वगळता सर्वांवर बंधने असणारा आहेत. मात्र, सध्या खरिप हंगामासाठी पेरण्या, लागवडी सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर शेतीच्या कामात अडचणी येतील. त्यामुळे शेतीच्या कामांसाठी सलवती देण्यात येणार आहेत. 

याबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले की, सध्या खरिप हंगामाच्या कामांसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. त्यामुळे या कडक लाॅकडाउनच्या काळातही शेतीच्या कामांमध्ये सलवत देणार आहे. शेतकऱ्यांची कोणतीही अडवणूक करणार नाही. शेतकऱ्यांना कामात कोणतीही त्रास होणार नाही. 

Edited by : Nilesh Shende 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: These are the terms and conditions for agricultural work in the lockdown