esakal | बँकांचे हे नवे नियम होणार आजपासून लागू!
sakal

बोलून बातमी शोधा

Bank-Money-Transaction

अनेक कंपन्या बँकांतून मोठ्या प्रमाणात रोकड काढत असल्याचे समोर आले होते. अशा मोठ्या रोख व्यवहारांना आळा घालणे व कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केले.

बँकांचे हे नवे नियम होणार आजपासून लागू!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : एका वर्षात बँक खात्यातून 1 कोटीपेक्षा अधिक रक्कम काढल्यास 2 टक्के उद्गम करकपात (टीडीएस) करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी 1 सप्टेंबरपासून होत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात याबाबतची घोषणा केली होती.

अनेक कंपन्या बँकांतून मोठ्या प्रमाणात रोकड काढत असल्याचे समोर आले होते. अशा मोठ्या रोख व्यवहारांना आळा घालणे व कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केले. 1 सप्टेंबरपूर्वी ज्यांनी 1 कोटी रुपयांची रोकड काढली आहे, अशांना आता पुढील प्रत्येक रोख व्यवहारावर 2 टक्के टीडीएस द्यावा लागणार आहे.

दरम्यान, एखाद्या व्यावसायिकाला लग्नसोहळा, घरबांधणी अशा अन्य सेवांसाठी वर्षभरात 50 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम अदा केली, तर त्यावरही 5 टक्के टीडीएस कपात होणार आहे. शिवाय आयआरसीटीसी ऑनलाइन रेल्वे तिकिटाच्या बुकिंगवर 15 ते 30 रुपयांचा सेवाकर द्यावा लागणार असून, ज्यांनी आतापर्यंत आपला आधार क्रमांक पॅन कार्डसोबत लिंक केलेला नाही अशांचे पॅन क्रमांक रद्द करून नवे पॅन कार्ड दिले जाणार आहे.

आयुर्विमा पॉलिसीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर मिळणारी रक्कम करपात्र असेल तर, त्यावरही 5 टक्के उद्गम करकपात केली जाणार आहे.

loading image
go to top