

Massive New Year Devotee Rush at Theur Chintamani Temple
Sakal
सुनील जगताप
थेऊर : आज नववर्षाचे औचित्य साधून हवेली तालुक्यातील थेऊर येथील अष्टविनायका पैकी एक असलेल्या श्री चिंतामणीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अभुतपुर्व गर्दी झाली होती. मात्र मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच फुले व दुर्वा विक्रीस बसलेल्या दुकानदारांमुळे भाविकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.काही वर्षांपूर्वी मांढारदेवी काळूबाई येथे जत्रेत गर्दीमुळे मोठी दुर्घटना घडली होती.यामध्ये अनेकांना प्राणास मुकावे लागले होते अशी दुर्घटना घडलेनंतर प्रशासन जागे होणार का? असा सवाल भाविकांना सतावत आहे.