esakal | Video : अष्टविनायकांपैकी एक असलेल्या थेऊरच्या चिंतामणीची द्वारयात्रा
sakal

बोलून बातमी शोधा

Theur Ganpati Dwaryatra

याबाबत अधिक माहिती देताना शशांक देव म्हणाले, महानसाधू श्री मोरया गोसावी यांचे वंशज भाद्रपद द्वारयात्रेस पिंरगुटहुन थेऊर येथे येतात. यावेळी प्रतिपदा व द्वितीया एकाच दिवशी आल्याने दोन द्वार शनिवारी करावयाचे आहेत. शनिवारी (ता. 31) मंदिरांच्या पूर्व दिशेला कोरेगाव मूळ येथे ओझराई देवीची महापुजा करण्यात आली.

Video : अष्टविनायकांपैकी एक असलेल्या थेऊरच्या चिंतामणीची द्वारयात्रा

sakal_logo
By
जनार्दन दांडगे

थेऊर (पुणे) : भाद्रपद चतुर्थीनिमित्त अष्टविनायकांपैकी एक प्रमुख स्थान समजल्या जाणाऱ्या थेऊर (ता. हवेली) येथील श्री चिंतामणी गणपती मंदिरात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मागील दोन दिवसापांसून द्वारयात्रा चालू असून, या द्वारयात्रेची सांगता सोमवारी (ता. 3) सायंकाळी थेऊर येथील महा-तारी आई मंदिरात करण्यात आली असल्याची माहिती पिरंगुटकर देव मंडळींचे प्रमुख विश्वस्त शशांक देव यांनी दिली. 

याबाबत अधिक माहिती देताना शशांक देव म्हणाले, महानसाधू श्री मोरया गोसावी यांचे वंशज भाद्रपद द्वारयात्रेस पिंरगुटहुन थेऊर येथे येतात. यावेळी प्रतिपदा व द्वितीया एकाच दिवशी आल्याने दोन द्वार शनिवारी करावयाचे आहेत. शनिवारी (ता. 31) मंदिरांच्या पूर्व दिशेला कोरेगाव मूळ येथे ओझराई देवीची महापुजा करण्यात आली. या पुजेनंतर मोरया गोसावी यांनी रचलेली पदे गायली जातात. शनिवारी दुपारी दुसरे द्वार दक्षिण दिशेला आळंदी म्हातोबा येथील आसराई देवीची आराधना मोठ्या भक्तीभावाने करण्यात आली. आसराई देवीला महापुजा नैवेद्य दाखवून, मोरया गोसावी यांनी रचलेली पदे गायली गेली. गायली जातात. रविवारी (ता. 1) तिसऱ्या द्वारानिमित्त मांजरी बुद्रुक येथील मांजराई देवीची महापुजा नैवेद्य दाखवुन, पारंपारिक पध्दतीने पुजा करण्यात आली.

दरम्यान सोमवारी (ता. 2) गणपती प्रतिष्ठाना करण्यात आली असून, चतुर्थीचे निमित्त साधत सोमवारी थेऊर गावची ग्रामदैवता महा-तारीआई देवीच्या मंदीरात चौथे द्वारानिमित्त पूजा करण्यात आली. पिरंगुटकर देव मंडळींसह या ठिकाणी शंशाक देव, गणेश देव यांच्यासह पुजारी महेश आगलावे व त्याच्या सहकाऱ्यांच्यासह थेऊर परीसरातील ग्रामस्थांनी सहभाग घेतला. सोमवारी रात्री महापुजा करण्यात आली. महापुजेनंतर छबिन्याचा कार्यक्रम पार पडला. छबिन्याचा कार्यक्रम पार पडताच, चिंतामणीची द्रुष्ट काढण्यात आली. त्यानंतर पारपांरीक टिपऱ्यांचा कार्यक्रम व देव कुटुबियांचा चार दिवसांचा उपवास मटकी उसळीच्या प्रसादाने सोडण्यात आला व महाद्वारयात्रेची सांगताही करण्यात आली.

loading image
go to top