Pune Crime News : राष्ट्रीय संमेलनासाठी आणलेले सोन्या-चांदीचे दागिने लक्झरी बसमधून चोरीला

Gold and Silver Jewellery Stolen from Luxury Bus in Pune : थेऊर फाटा येथील तृतीयपंथीय समाजाच्या राष्ट्रीय संमेलनासाठी विक्रीला आणलेले हैदराबादच्या सुवर्णकाराचे दोन लाख ३८ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लक्झरी बसमधून चोरीला गेले.
Gold and Silver Jewellery Stolen from Luxury Bus in Pune

Gold and Silver Jewellery Stolen from Luxury Bus in Pune

sakal
Updated on: 

लोणी काळभोर : थेऊर फाटा (ता. हवेली) येथील वृंदावन पॅलेस येथे आयोजित तृतीयपंथीय समाजाच्या राष्ट्रीय संमेलनात विक्रीसाठी आणलेले सोन्या-चांदीचे दागिने लक्झरी बसमधून चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत हैदराबाद येथील एका सुवर्णकाराचे तब्बल २ लाख ३८ हजार रुपयांचे दागिने गायब झाले आहेत. प्रवासादरम्यान बसमध्ये ठेवलेल्या बॅगेतील दागिन्यांचे दोन प्लास्टिकचे डबे अज्ञात चोरट्याने लंपास केले.

Loading content, please wait...