

Court Notice to Police
esakal
थेऊर :- थेऊर येथील श्री चिंतामणी यशवंत सहकारी साखर कारखानाच्या कथित बोगस वार्षिक सर्वसाधारण सभा आणि बनावट प्रोसिडिंगच्या गंभीर प्रकरणाची न्यायालयाने दखल घेत तक्रारदार विकास लवांडे व सहकाऱ्यांनी दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी करताना लोणी काळभोर पोलीस स्टेशनमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही म्हणून जिल्हा न्यायालयाने लोणी काळभोर पोलीस स्टेशनला नोटीस देवून येत्या १८ डिसेंबर रोजी उत्तर सादर करण्यास सांगितले आहे.