
मंचर : “आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघात ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा मोठा प्रभाव असतानाही त्यांचे स्थानिक लोकप्रतिनिधी त्यांना सोडून गेले. मात्र, ते आजही एकमेकांच्या शेजारी बसतात, एकमेकांचे बुके घेतात. पण माझ्या पक्षातून गद्दारी करून गेलेले माझ्यासमोर येत नाहीत, माझ्या नजरेला नजर भिडवायची त्यांना हिंमत होत नाही.” अशा शब्दांत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पक्ष सोडलेल्यांवर टीकेचे बाण सोडले.