व्हरांड्यातच `ते` दोघे अडकले विवाह बंधनात

khadaki12.jpg
khadaki12.jpg

खडकी बाजार (पुणे) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारतर्फे सर्व कार्यक्रमांबरोबर लग्नकार्यासाठी ही बंदी घालण्यात आली आहे. फक्त पन्नास व्यक्ती लग्नात सहभागी होऊ शकतात असा आदेश जारी करण्यात आला आहे. सर्व नियमांचे पालन करत निगडी येथील अंकुश चौक श्री पुण्याई हौसिंग सोसायटीमध्ये निगडी पोलीस ठाण्याच्या परवानगीने कांबळे यांची कन्या कोमल व साळुंके यांचे चिरंजीव राम यांचा लग्नसोहळा बौद्ध समाज पद्धतीने पार पडला.

यावेळी वधू- वरासह उपस्थित पाहुणे मंडळींनी सोशल डिस्टन्स ठेऊन मास्क लावून शासनातर्फे दिलेल्या नियमांचे पालन केले. घरासमोर व्हरांड्यात गालिचा टाकून छोटासा मंडप टाकण्यात आला होता. दीड वाजता भन्तेजीनी लग्न कार्यास सुरवात केली. फक्त पंधरा मिनिटातच लग्न पार पाडण्यात आले.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

कायदेशीर बाबी तपासत भन्तेजींनी वर राम यास वधू कोमलच्या गळ्यात मंगळसूत्र  घालण्यास सांगून वर वधुनी एकमेकांच्या गळ्यात पुष्पहार घातले व कोमल व राम हे एकमेकांच्या लग्नाच्या पवित्र बंधनात बांधले गेले. उपस्थित नातेवाईक व आप्तेष्ट यांनी पुष्पवृष्टी केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com