'पोलिसवाले को खतम कर दो' म्हणत चोरट्याने केला सुऱ्याने हल्ला

police
police

पुणे - घरफोडी करून पळून जाण्याच्या मार्गावर असलेल्या चोरट्याने त्यांचा पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या गस्ती पथकावर सुऱ्याने हल्ला केला. ही घटना मंगळवारी रात्री वारजे-माळवाडी येथील आंबेडकर चौकात घडली. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 


सागरसिंग कालूसिंग जुन्नी (रा. वैदूवाडी हडपसर) आणि जलसिंग जर्मनसिंग जुन्नी (रा. पाटील इस्टेट झोपडपट्टी , शिवाजीनगर ) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, वारजे माळवाडी गस्ती पथकाला मंगळवारी रात्री साईराम व्हील सोसायटीमध्ये घरफोडी होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानूसार गस्तीवरील पथक तेथे पोहचताच सराईत चोरटे पळून जाऊ लागले होते. पोलिसांनी त्यांना पाठलाग करुन मुद्देमालासह रंगेहाथ पकडले. मात्र पोलिसांकडून सुटका होण्यासाठी यातील एकाने मार्शलवर सुऱ्याने वार केले. मात्र अंगावरील रेनकोटमुळे मार्शल बचावले. चाकूच्या वाराने पोलिस मार्शलच्या अंगावरील रेनकोट फाटला, मात्र त्याला इजा झाली नाही. चोरट्यांकडून एक लाख 48 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आदी हस्तगत करण्यात आली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

'पोलिसवाले को खतम कर दो' : 
 पोलिस घटनास्थळी पोहचताच दोघे आरोपी दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन पळून जाण्याच्या तयारीत होते. त्यांना मार्शल शिरसाठ व फिरोज शेख यांनी पकडून ठेवले. त्यावेळी 'पोलिसवाले को खतम कर दो' असे म्हणत चोरट्याने चाकूने हल्ला केला. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक मच्छिंद्र पंडीत यांनी भेट दिली. आरोपींवर चोरी, खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा, असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com