चोरी करायला गेले चक्क प्राथमिक शाळेत

Shala
Shala

सातगाव पठार (पुणे) : भावडी (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत वर्गाचे मागील बाजूला असलेली खिडकी तोडून चोरट्यांनी आत शिरून चोरीचा प्रयत्न केल्याची माहिती मुख्याध्यापिका नंदा पवार यांनी दिली.

भावडी येथील शाळेतील शिक्षक सोमवारी सर्व वर्ग बंद करून सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी शाळा उघडण्यासाठी आले असता चोरीचा प्रकार लक्षात आला. शाळेच्या वर्गाच्या मागील बाजूस असलेल्या खिडकीचे गज वाकवून तोडून चोरट्यांनी वर्गात प्रवेश केल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी दोन कपाटे उघडून सामानाची उचकापाचक केली. मात्र शिक्षकांनी पाहणी केली असता चोरीला काहीही गेले नसल्याचे लक्षात आले. शिक्षकांनी तत्काळ शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गुलाब कातळे, उपाध्यक्ष सारिका बाजारे यांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर मंचर पोलिस ठाण्यास कळविले असता पोलिस हवालदार कैलास कड यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन सदर घटनेचा पंचनामा केला.

याप्रसंगी केंद्रप्रमुख विजय सुरकुले, उपसरपंच विशाल चक्कर, नितीन काळे, पंढरी काळे, रवींद्र कातळे, विकास मोरे, बाळासाहेब कातळे, कैलास चक्कर, आनंद चक्कर उपस्थित होते. दरम्यान, चोरीच्या पार्श्‍वभूमीवर गावात रात्रीच्या वेळी गस्त घालणे गरजेचे असून, यासाठी गावातील तरुणांचे ग्रामसुरक्षा दल स्थापन करून रोज रात्रीच्या वेळी गस्त घातली जाणार असल्याचे पोलिस पाटील गोरक्षनाथ नवले यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com