पुणे : 'त्या' महिला...बोगस बॅंक अधिकारी..अन् ते पैसे...

cyber.jpg
cyber.jpg
Updated on

पुणे : बँक अधिकारी असल्याचे भासवून सायबर गुन्हेगारांनी एका महिलेच्या बँक खात्यातील 92 हजार रूपयांची रक्कम चोरली. याप्रकरणी महिलेने अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

फिर्यादी महिला या कोथरूडमध्ये राहतात. मागील महिन्यात फिर्यादीच्या मोबाइलवर अनोळखी व्यक्तिने संपर्क साधला. त्याने फिर्यादी महिलेला आपण बँक अधिकारी असल्याचे भासवून त्यांच्या बँकेतील ग्राहकांची माहिती अद्ययावत करायची आहे. असे सांगून त्याने महिलेच्या बँक खात्याची गोपनीय माहिती मिळवली. त्यानंतर महिलेच्या बँक  खात्यातून परस्पर ९२ हजार ९९१ रूपये अनोळखी व्यक्तिने लांबविले.

दरम्यान, हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी अलंकार पोलिसांकडे फिर्याद नोंदविली. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) राजेश तटकरे करीत आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com