आंबेठाण - मागील १२ ते १३ दिवसांपासून वराळे आणि लगतच्या भागात गाड्यांच्या बॅटरी आणि डिझेल चोरी करणारे चोरटे वराळे येथील तरुण आणि पोलिसांच्या हातून थोडक्यात निसटले. परंतु पळून जात असताना त्यांची गाडी पलटी झाली आणि गाडी जागेवर सोडून त्यांना पळ काढावा लागला. ही घटना काल रात्री ( दि. २९ ) अडीचच्या सुमारास घडली.