goat theft
sakal
शिरूर - मुस्लिम धर्मियांत महत्व असलेल्या बकरी ईदच्या कुर्बानी साठी खरेदी केलेले आणि घराबाहेर, ओट्यावर व गोठ्यात बांधलेले १७ बोकड चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना काल येथे उघडकीस आली. शहरातील मंगलमूर्ती नगर, बाबूराव नगर, कुंभार आळी या भागातून चोरलेल्या या बोकडांची किंमत अंदाजे सात ते आठ लाख रूपये होत आहे.