सिनेस्टाईल चोरांचा पाठलाग केला अन्...​

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 15 September 2020

मेडीकलमध्ये चोरी करून फरार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्यांना जखमी असतानाही दुकानदाराने प्रतिकार केला. दुकानदाराने चोरट्यांच्या दुचाकीला लाथ मारल्याने त्यांचा पळून जाण्याचा प्लॉन फसला. मात्र, त्यानंतर चोरट्यांना पळून जाण्यात यश आले असेल तरी त्यातील एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बालेवाडी (पुणे) : मेडीकलमध्ये चोरी करून फरार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्यांना जखमी असतानाही दुकानदाराने प्रतिकार केला. दुकानदाराने चोरट्यांच्या दुचाकीला लाथ मारल्याने त्यांचा पळून जाण्याचा प्लॉन फसला. मात्र, त्यानंतर चोरट्यांना पळून जाण्यात यश आले असेल तरी त्यातील एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

साई चौकाजवळील न्यू अंबिका मेडिकलमध्ये रविवारी (ता. 13) रात्री सव्वा दहाच्या सुमारास तिघांनी सशस्त्र चोरी केली. त्यात त्यांनी 50 हजार रुपये चोरून नेले. तसेच दुकानमालक उमेद चौधरी यांना मारहाण करून जखमी केले. या प्रकरणी चौधरी यांनी चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चॉकलेट व खोकल्याच्या गोळ्या घेण्याच्या बहाण्याने दोघेजण दुकानात आले. तर तिसरी व्यक्ती मेडीकलबाहेर दुचाकीवर बसून होती. ग्राहक नाहीत हे पाहून तिसराही चोरटा दुकानात शिरला. त्यातील दोघांकडे पिस्तूल व सुरा होता. त्यांनी चौधरी यांना सुरा लावत दुकानातील पन्नास हजारांची रोकड चोरली व पळून जाऊ लागले. त्यामुळे चौधरी यांनी पाठलाग करीत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यातील एकाने सूऱ्याने त्यांच्या डोक्यावर अन् हातावर वार केला. त्यात जखमी झाल्यानंतरही त्यांनी प्रतिकार केला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चोर दुचाकीवर बसण्यासाठी जात असता चौधरी यांनी दुचाकीला जोरदार लाथ मारली. त्यामुळे दुचाकीसही तिघेही रस्त्यावर पडले. समोरून चारचाकी येत असल्याचे पाहून त्यांनी पैसे घेऊन पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच पोलिस तेथे दाखल झाले होते. दुचाकीवरून तपास करीत पोलिसांनी राजू प्रजापती (वय 25, रा. वाल्हेकर वाडी, चिंचवड)  याला ता. 14 रोजी  रात्री अटक करण्यात आली  आहे. पुढील तपास चतुश्रृंगी पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक मोहन जाधव करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thieves stole Rs 50,000 from medical