Nirgudsar News : कृषीपंपांच्या केबलवर चोरट्यांचा डल्ला

आंबेगाव तालुक्यातील घोडनदी आणि मीना नदीकाठी अनेक गावांमध्ये सातत्याने केबल चोरीच्या घटना घडत आहे.
Thieves Target Agricultural Pump Cables ambegaon tehsil area

Thieves Target Agricultural Pump Cables ambegaon tehsil area

sakal

Updated on

निरगुडसर - कृषीपंपांच्या केबलवर चोरीमुळे शेतकरी हैराण झाला असून, आंबेगाव तालुक्यातील वळती-नागापूर येथील मीना नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यालगत २० शेतकऱ्यांच्या शेती सिंचनासाठी बसवलेल्या कृषीपंपांच्या केबल अज्ञात चोरट्यांनी कापून लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, शेतीसाठी पाणी पुरवठा ठप्प होऊन एक लाख रुपयांहून अधिक नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com