esakal | Pune : पावसाळी गटारांवरील लोखंडी झाकणे चोरणाऱ्यांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

crime

Pune : पावसाळी गटारांवरील लोखंडी झाकणे चोरणाऱ्यांना अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कल्याणीनगर परिसरात रस्त्यावरील पावसाळी गटारांवरची लोखंडी झाकणे चोरणाऱ्या चोरट्यांना येरवडा पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून सहा लोखंडी झाकणे व रिक्‍शा असा मुद्देमाल जप्त केला. निलेश विलास पवार (वय 22 ), सुरेश अनिल पाटोळे (वय 31), रोमा सुनील पवार (वय 35, तिघेही रा. लक्ष्मीनगर, येरवडा) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाकडून कल्याणीनगर भागात पावसाळी गटारे तयार करण्यात आली. या गटारांवर महापालिकेने लोखंडी झाकणे बसविली होती. मात्र मागील काही दिवसांपासून हि लोखंडी झाकणे चोरीला जाण्याच्या घटना घडल्या होत्या. याप्रकरणी 20 ऑगस्ट रोजी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू होता. चोरटे लोखंडी झाकणे चोरुन रिक्‍शातुन पळून जात असल्याचे पोलिसांच्या तपासात निदर्शनास आले होते. दरम्यान, कल्याणीनगर परिसरात गटारावरील झाकणे चोरणारे चोरटे नगर रस्त्यावर थांबल्याची माहिती हडपसर परिसरात गस्त घालणारे पोलिस कर्मचारी अनिल शिंदे व अमजद पठाण यांना मिळाली.

हेही वाचा: Paralympic : बॅडमिंटनला सोनेरी दिवस; प्रमोदनं रचला नवा इतिहास!

त्यानुसार, पोलिसांनी त्यांना सापळा रचून पकडले. पोलिसांनी त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांनी झाकणे चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीस गेलेली 36 हजार रुपये किंमतीची सहा झाकणे व चोरीसाठी वापरलेली रिक्‍शा असा 86 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजयसिंह चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी व कर्मचारी प्रदीप सुर्वे, गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, गणेश वाघ, किरण घुटे यांच्या पथकाने हि कारवाई केली.

loading image
go to top