मधमाश्‍यांच्या हल्ल्यात तेरा विद्यार्थी जखमी

Bee-Attack
Bee-Attack

नारायणगाव - महाविद्यालयाच्या भिंतीवर असलेल्या आग्या मोहोळातील मधमाश्‍यांनी केलेल्या हल्ल्यात येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील दहा विद्यार्थिनी व तीन विद्यार्थी जखमी झाले. जखमींवर येथील खासगी, प्राथमिक व मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले, अशी माहिती प्राचार्य श्रीकांत शेवाळे यांनी दिली.

मधमाश्‍यांच्या हल्ल्यात प्रतीक्षा वायाळ, तनुजा टेमगिरे, प्रज्ञा टेमगिरे, गीतांजली पिंगळे, प्रणाली शिंदे, सिद्धी पोखरकर, आरती जाधव, प्रियांका पाबळे, निकिता निघोट, गीतांजली निघोट या विद्यार्थिनी व प्रथमेश हांडे याच्यासह अन्य दोन विद्यार्थी जखमी झाले. उपचारानंतर सर्व विद्यार्थ्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

या बाबत शेवाळे म्हणाले, महाविद्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर आग्या मोहोळ आहे. आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने पोळ्याला दगड मारून मधमाश्‍यांना डिवचले. यामुळे चवताळलेल्या मधमाश्‍यांनी महाविद्यालय परिसरात असलेल्या विद्यार्थ्यांवर हल्ला चढविला. मधमाश्‍यांचा दंश झाल्याने कला, वाणिज्य, विज्ञान, बीबीए व बीसीए शाखेत शिक्षण घेत असलेल्या नारायणगाव, उंब्रज, मंचर, अवसरी, थोरांदाळे, निमगावसावा परिसरातील दहा विद्यार्थिनी व तीन विद्यार्थी जखमी झाले. बहुतेक विद्यार्थ्यांच्या चेहरा, कान, हात या अवयवांवर मधमाश्‍यांनी दंश केला आहे. महाविद्यालयाने तातडीने रुग्णवाहिका बोलावून विद्यार्थ्यांना नारायणगाव येथील खासगी, प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर दहा विद्यार्थ्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले. मधमाश्‍यांच्या हल्ल्यामुळे घाबरलेल्या तीन विद्यार्थिनींना मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. आज सायंकाळी उपचारानंतर सर्व विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती प्राचार्य शेवाळे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com