Sports News: आंबेगावच्या १३ वर्षीय विधी भोरची किमया; ४२ किमी जलतरण अवघ्या ७ तास ३२ मिनिटांत पार

आंबेगावच्या १३ वर्षीय विधी भोरची ४२ किमी जलतरणात विक्रमी झेप; सात तासांत अटल सेतूपर्यंतचा प्रवास गाठत शिवछत्रपती पुरस्काराने गौरव
Aquatics Record: 13-Year-Old Vidhi Bhore Conquers 42 Km Open Water Swim

Aquatics Record: 13-Year-Old Vidhi Bhore Conquers 42 Km Open Water Swim

Sakal

Updated on

मंचर : आंबेगाव तालुक्यातील भोरवाडी येथील कन्या कु. विधी नंदकुमार भोर (वय १३) हिने जलतरण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. रूपाली रेपाळे स्विमिंग अकॅडमीच्या माध्यमातून तिने धामणतर जेटी ते अटल सेतू हे तब्बल ४२ किलोमीटर अंतर अवघ्या ७ तास ३२ मिनिटांत यशस्वीरीत्या पूर्ण करत विक्रमी कामगिरी नोंदवली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com