esakal | पुणे RTO ला यंदाही फटका;१४ दिवसांत फक्त चार कोटी महसूल
sakal

बोलून बातमी शोधा

rto-office-pune

पुणे RTO ला यंदाही फटका;१४ दिवसांत फक्त चार कोटी महसूल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : अक्षयतृतीयेचा(Akshay Trithiya) मुहूर्त वाहन क्षेत्रासाठी यंदाच्या वर्षीही निराशजनक ठरला. गेल्या १४ दिवसांत ७० दुचाकी तर, १८७ मोटारी शहरात विकल्या गेल्या. मालवाहतुकीची १४१ वाहनांची ग्राहकांनी खरेदी केली. त्यामुळे आरटीओच्या (RTO) तिजोरीत अवघा ४ कोटी १७ लाखांचा महसूल(Revenue) जमा झाला. (This year Pune RTO earned only four crore revenue in 14 days)

लॉकडाउनमुळे सध्या शो-रूम बंद आहेत. त्यामुळे वाहन नोंदणीवरही परिणाम झाला आहे. एरवी एप्रिल महिन्यात वाहन खरेदी मोठ्या प्रमाणावर होत असते. यंदा १ ते १५ मे दरम्यान ७० दुचाकी, १८७ मोटारी, १४१ मालवाहतुकीची वाहने, ११ मोबाईल क्लिनिक, ३ बस, ३ टॅक्सींची नोंदणी झाली आहे. एप्रिल २०१९ मध्ये शहरात तब्बल २२ हजार ८५० वाहनांची नोंदणी झाली होती. मात्र, गेल्या वर्षीपासून कोरोनाचे संकट असल्यामुळे वाहन विक्री कमालीची खालावली आहे.

गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात फक्त १०३४ वाहनांची विक्री झाली होती. यंदा मात्र, त्या परिस्थितीत काहीशी सुधारणा होऊन ६ हजार ५७३ वाहनांची विक्री झाल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिली.

''शो-रूम बंद असले तरी नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने खरेदीवर भर दिला. तसेच आरटीओ कार्यालयात नोंदणीही ऑनलाइन पद्धतीने झाली आहे.''

-अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

loading image
go to top