खड्डे बुजवा अन्यथा आंदोनलनासाठी रस्त्यावर उतरणार

  नवनाथ भेके निरगुडसर
Tuesday, 15 September 2020

आंबेगाव तालुक्यातील मंचर-रांजणी रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा मानला जातो अंदाजे १५ किमी लांबीच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. हेच खड्डे आता प्रवाशांना आजाराचे निमंञण देणारे ठरत आहेत. अनेक महिन्यापासुन रस्त्याची दुरुस्ती केली नसल्याने रस्ता खड्डयात गेला आहे. रांजणी, कारफाटा, थोरांदळे, खडकीफाटा, चांडोलीफाटा तसेच एस कॅार्नर, तुकानाना चौक आदी ठिकाणी रस्त्यावर पडलेल्या खड्डयांमुळे प्रवाशांना ञास सहन करावा लागत आहे.

निरगुडसर : ''रोजचा थोरांदळे गाव ते मंचरचा प्रवास आता मणक्याच्या व्याधीवर बेतु लागला आहे कारण की रस्त्यावरील खोल खडड्यातून होणाऱ्या रोजच्या प्रवासामुळे माझे मणके सैल झाले आहेत. रस्ता अपघाती बनला असुन तातडीने खड्डे बुजवा प्रवाशांच्या जीवाशी खेळु नका अन्यथा आम्हाला जनआंदोलन करावे लागेल,''असा इशारा आखिल भारतीय ग्राहक पंचायत समितीचे तालुका संघटक नितिन मिंडे यांनी दिला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आंबेगाव तालुक्यातील मंचर-रांजणी रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा मानला जातो अंदाजे १५ किमी लांबीच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. हेच खड्डे आता प्रवाशांना आजाराचे निमंञण देणारे ठरत आहेत. अनेक महिन्यापासुन रस्त्याची दुरुस्ती केली नसल्याने रस्ता खड्डयात गेला आहे. रांजणी, कारफाटा, थोरांदळे, खडकीफाटा, चांडोलीफाटा तसेच एस कॅार्नर, तुकानाना चौक आदी ठिकाणी रस्त्यावर पडलेल्या खड्डयांमुळे प्रवाशांना ञास सहन करावा लागत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खडडयांतून प्रवास करणे म्हणजे आजाराला निमंञण देणे आहे, त्यामुळे आखिल भारतीय ग्राहक पंचायत समितीचे तालुका संघटक नितिन मिंडे यांच्या बरोबर अनेकांना मणक्याचे आजार निर्माण झाले आहे, या मार्गावर अपघातांचे प्रमाण खड्डयांमुळे मोठया प्रमाणात वाढले असुन अँम्बुलन्सलाही रुग्णांना उपचारासाठी वेळेवर पोहचवता येत नाही अत्यावश्यक सेवा देणाऱ्या अँम्बुलन्सचाही प्रवास देखील खडतर बनला आहे. याबाबत नितिन मिंडे यांनी कार्यकारी अभियंता उत्तर विभाग पुणे यांना पञाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नितिन मिंडे म्हणाले की, ''थोरांदळे ते मंचरचा माझा रोजचा प्रवास असतो परंतु रस्त्यावरील खड्डयांमुळे माझे काम राहीले बाजुला, पण आता मला मणक्याच्या व्याधीचाच ञास होऊ लागला आहे. माझ्याबरोबर अनेकांनाही याचा ञास आहे. त्यामुळे खड्डे बुजवा अन्यथा आंदोनलनासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला.''
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thorandale to Manchar road fill the pits or else take to the streets for agitation