
पुणे : योगासने करण्यासाठी खचाखच भरलेला मांडव...प्रोत्साहन देणारे नृत्य...टाळ्यांच्या गजरात दिली जाणारी दाद...अन् व्यासपीठावरून येणाऱ्या सूचनांप्रमाणे योग करण्यात एकाग्र झालेले आबालवृद्ध...सकाळच्या वेळी पावसाच्या सरी बरसत असताना अतिशय उत्साहात, आनंदाने हजारो नागरिक एकाच वेळी योगासने करत होती.