बारामतीतील नीरा नदी बंधाऱ्यावर प्रदूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत्यूमुखी; मासे गोळा करण्यासाठी झुंबड

baramati
baramatiesakal

वडगाव निंबाळकर : स्वच्छ पाण्याच्या दिशेने जाण्यासाठी लाखो मासे झुंडीने निघाले होते. पण उंचावरून पाणी पडत असल्याने त्यांचा प्रवास थांबला आणि माशांच्या समूह पकडण्यासाठी नागरिकांसह पशु पक्षांची ही झुंबड उडाली. अक्षरशः चारचाकी वाहनात भरून लोकांनी मासे नेले होळ ता. बारामती येथिल ढगाई मंदीरापाठीमागील नीरा नदी बंदाऱ्यावर हा प्रकार रविवार सकाळ पासून पहायला मिळाला.

baramati
BJP Leader: मोठी बातमी! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या

मंदिराच्या पाठीमागे असलेल्या मुरूम बंधाऱ्यात स्वच्छ पाणी तर पुढील होळ कोऱ्हाळे खुर्द भागातील बंदाऱ्यात दूषित पाणी असे चित्र आहे. यामुळे माशांचा प्रवास दूषित पाण्याकडून स्वच्छ पाण्याकडे सुरू होता गेल्या आठ दिवसांपासून दूषित पाणी सोडण्याचे प्रमाण कारखान्यांकडून मोठ्या प्रमाणात झाले यातून कडक उन्हामुळे पाणीसाठा थोडा कमी झाला

परिणामी माशांचा प्रवासाचा वेग वाढला गेल्या चार दिवसांपासून वरच्या मुरूम बंधाऱ्यातील पाणी खालच्या होळ बंधाऱ्यात उंचावरून पडू लागले आणि माशांच्या प्रवासाला अडथळा निर्माण झाला. स्वच्छ पाणी पडत असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झुंडीने मासे येऊ लागले.

baramati
Ajit Pawar: "अजित पवार उद्याचे मुख्यमंत्री", शिंदे गटाच्या नेत्याचं विधान

पशुपक्ष्यांचा मोठ्या प्रमाणात वावर होऊ लागल्यामुळे लोकांचे लक्ष गेले. मोठ्या प्रमाणात मासे आहेत याची माहिती नदीकाठच्या लोकांना मिळाली आणि लोकांनी मासे पकडण्यासाठी एकच गर्दी केली. सहजासहजी मासे मिळून येत असल्यामुळे वाहनात भरून लोकांनी मासे नेले.

दूषित पाण्यामुळे माशांचे जीवन असाह्य झाले आहे. चांगल्या पाण्याच्या दिशेने जाणारा प्रवास थांबल्यामुळे लाखोंच्या संख्येने मासे मृत्युमुखी पडत आहेत बंधाऱ्याच्या कडेला अक्षरशा मृत माशांचा खच आढळून आला. याबाबत निसर्गप्रेमींनी हळहळ व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com