MPSC Exam : हजारो विद्यार्थी अपात्रतेच्या उंबरठ्यावर! पीएसआय पदासाठी वयोमर्यादा गणनेची अट; एक संधी देण्याची मागणी
एमपीएससी जाहिरात प्रसिद्ध होण्यास झालेला सात महिन्यांचा विलंब आणि वयोमर्यादा गणनेची जाचक अट यामुळे ‘एमपीएससी’चे हजारो विद्यार्थी अपात्र होण्याच्या उंबरठ्यावर.
पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) जाहीर झालेल्या ‘संयुक्त पूर्व परीक्षा (गट-ब) २०२५’च्या जाहिरातीने एका बाजूला आनंदाचे वातावरण निर्माण केले असतानाच, दुसऱ्या बाजूला हजारो विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे.