पाहून घेऊ, असे म्हणत साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना धमक्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड झाल्याने साहित्य महामंडळ आणि साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना फोनवरून धमक्या दिल्या जात आहेत. 'पाहून घेऊ', 'दुर्योधन करू' अशा अर्वाच्च भाषेत धमकावले जात आहे.

पुणे : ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड झाल्याने साहित्य महामंडळ आणि साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना फोनवरून धमक्या दिल्या जात आहेत. 'पाहून घेऊ', 'दुर्योधन करू' अशा अर्वाच्च भाषेत धमकावले जात आहे.

दिब्रिटो यांच्या निवडीने काही नाराज व्यक्ती समाज माध्यमातून व फोनवर शिवीगाळ करत अर्वाच्च भाषेत धमकी देत आहेत. अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले पाटील व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी व मसाप कार्यालयात फोन येत आहेत. 'पाहून घेऊ' अशी धमकी दिली जात आहे. 

उद्या होणाऱ्या फादर दिब्रिटो यांच्या सत्कार समारंभात अडथळा निर्माण होऊ नये असे विनंती पत्र पुणे शहर पोलिस सहआयुक्त रवींद्र शिसवे यांना दिल्याचे मसाप प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांनी सांगितले. या कार्यक्रमास स्वतः शिसवे उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी मान्य केले आहे आणि संपूर्ण सुरक्षेची हमी दिली आहे. धमकी देणारे फोन बनावट नावे केले जातात असे पायगुडे यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Threaten to Sahitya Parishad Officers for Electing Francis DiBrito as president of Marathi Sahitya Sammelan