Pune Crime : वाहनाला कट मारल्यावरून पिस्तूल रोखले

वाहनाला कट मारल्यावरून एकावर पिस्तूल रोखल्याची घटना हडपसर परिसरात घडली. माळवाडी, हडपसर परिसरात बुधवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
Pune Crime
Pune Crime sakal

पुणे : वाहनाला कट मारल्यावरून एकावर पिस्तूल रोखल्याची घटना हडपसर परिसरात घडली. माळवाडी, हडपसर परिसरात बुधवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रताप धर्म टक्के (वय, ३९, रा. के. डी. हिल्स, शेलार मळा, कात्रज, पुणे) याच्या वाहनाला कट मारण्याच्या कारणावरून दुचाकीवरून जाणाऱ्या मुलांशी किरकोळ वाद झाला. त्यावेळी सुरक्षा रक्षक टक्के याने मुलांवर पिस्तूल रोखून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

Pune Crime
Pune Crime : उधार न दिल्याने तिघा तरुणांनी बिअर शॉपमधील कामगारास धारदार शस्त्राचा धाक दाखवत बिअर चोरून नेली

या घटनेबाबत प्राप्त तक्रारीवरून आर्म्स ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडील शस्त्र जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

जून २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत आमदार रोहित पवार यांच्याकडे खासगी सुरक्षा रक्षक म्हणून कामावर होता. सध्या तो त्यांच्याकडे सुरक्षारक्षक म्हणून काम करीत नाही, असे हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र शेळके यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com