केडगाव/ दौंड : वाखारी (ता. दौंड) येथील न्यू अंबिका कला केंद्रात झालेल्या गोळीबारप्रकरणी गुरुवारी पहाटे पोलिसांनी तिघांना अटक केली. या आरोपींना न्यायालयाने सोमवारपर्यंत (ता. २८) पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण संपांगे यांनी दिली.