

एकाच ठिकाणी लावले तीन बालविवाह
बारा जणांविरुद्ध गुन्हा; माढा तालुक्यातील आढेगाव येथील घटना
सकाळ वृत्तसेवा
टेंभुर्णी, ता. १३ : माढा तालुक्यातील आढेगाव येथे एकाच ठिकाणी तीन अल्पवयीन मुलींचे बालविवाह लावल्याप्रकरणी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात एका नवरदेवासह १२ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला.
आढेगाव येथे १० मे रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास तीन बालविवाह पार पडले होते. त्यावरून बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ चे कलम १६ अन्वये टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी (ता. १०) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास तीन जोडप्यांचे बालविवाह आढेगाव येथील कोरड्या तलावातील मोकळ्या पटांगणात झाले होते. ग्रामसेवक आकाश पवार यांना या बालविवाहाची माहिती समजताच त्यांनी अधिक चौकशी केली. विवाहित जोडप्यांचे आधार कार्डावरील वय पाहिले असता विवाहित तिन्ही मुली व दोन मुले असे पाचजण अल्पवयीन असल्याची माहिती मिळाली. यातील संशयित बाळू बापू घोडके, वनिता बाळू घोडके, नामदेव भगवान जाधव, अविदा नामदेव जाधव, नवरदेव नवनाथ नामदेव जाधव, बाबासाहेब मनोहर जाधव, राजीबाई बाबासाहेब जाधव, मनिषा शिवाजी भोसले (सर्व रा. आढेगाव) तसेच महादेव मारूती निकम, मंदा महादेव निकम (रा. दोघेही शहा ता. इंदापूर जि. पुणे), संतोष ज्ञानेश्वर निकम, सुनिता संतोष निकम (रा. दोघेही निर निमगाव ता. इंदापूर, जि. पुणे) या १२ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तीन मुलींसह दोन मुलेही अल्पवयीन
या विवाहितांमध्ये १४ वर्ष ४ महिने, १५ वर्ष ४ महिने, १७ वर्ष १० महिने अशा तीन अल्पवयीन मुली तर १८ वर्ष ९ महिने व १८ वर्ष ११ महिने अशी दोन अल्पवयीन मुले आहेत. तसेच २३ वर्ष वयाचा नवनाथ नामदेव जाधव याचा सोबत १५ वर्षीय मुलीचे लग्न लावून देण्यात आले होते. त्यामुळे टेंभुर्णी पोलिस ठाण्यात आकाश बापू पवार यांनी फिर्याद दाखल केली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक स्वाती सुरवसे या करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.