पुण्यातील IISERचे तीन शास्त्रज्ञ Indian Academy of Sciencesचे फेलो 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 6 January 2021

संबंधित संस्थेचे मानद सदस्यत्व म्हणजे फेलो. त्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल म्हणून ही निवड करण्यात येते. प्रामुख्याने वर्षभरासाठी ही निवड झालेली असते.

पुणे : पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (ISSER) तीन शास्त्रज्ञांची भारतीय विज्ञान अकादमी(Indian Academy of Sciences)चे फेलो म्हणून निवड करण्यात आली आहे. जीवशास्त्राचे प्रा. अंजन बॅनर्जी आणि डॉ. थॉमस पुकाडील, भौतिकशास्त्राच्या प्राध्यापक डॉ. सीमा शर्मा यांना ही फेलोशिप प्राप्त झाली आहे. तसेच प्रा.बॅनर्जी यांची राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे फेलो म्हणूनही निवड झाली आहे. 

यांचे संशोधन 
1) प्रा. बॅनर्जी : बटाट्याशी निगडित संशोधनामध्ये प्रा. बॅनर्जी यांची प्रयोगशाळा कार्यरत आहे. बटाट्याच्या वाढीमध्ये भूमिका बजावणाऱ्या जैविक रेणूंच्या नियंत्रणासंबंधी त्यांचे संशोधन आहे. आधुनिक जैवतंत्रज्ञान, जैवमाहितीशास्त्र आदींच्या साहाय्याने प्रा. बॅनर्जींच्या प्रयोगशाळेत संशोधन चालू आहे. 

2) डॉ. पुकाडील : पेशीद्रव्यातील मेंम्बरेनच्या विभाजनासंबंधीचे संशोधन डॉ. पुडालीक यांच्या प्रयोगशाळेत चालते. पेशीमध्ये विविध क्रियांसाठी मेंम्ब्रेनची निर्मिती केली जाते. या मेंम्ब्रेनसंबंधीच्या प्रथिनांचे संशोधन. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा  

3) डॉ. शर्मा  : विश्‍वाच्या मूलभूत रचना समजून घेण्यासाठी डॉ. शर्मा यांची प्रयोगशाळा मूलभूत कणांवर संशोधन करते. प्रोटॉन-प्रोटॉन धडकेचा अभ्यास या प्रयोगशाळेत होतो. नव्या मूलभूत कण आणि त्यांच्यातील अभिक्रेये संदर्भातील सैद्धांतिक मांडणी अर्थात सुपरसीमेट्रीसंबंधीचे संशोधन, कॉस्मिक ऑब्झर्वेशन संबंधीचे संशोधन. 

फेलो म्हणजे काय? 
संबंधित संस्थेचे मानद सदस्यत्व म्हणजे फेलो. त्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल म्हणून ही निवड करण्यात येते. प्रामुख्याने वर्षभरासाठी ही निवड झालेली असते. देशातील विज्ञान क्षेत्रातील नावाजलेली संस्था असलेल्या भारतीय विज्ञान अकादमीची बंगळूर येथे 1934 मध्ये तर 1930 मध्ये राष्ट्रीय विज्ञान अकादमीची स्थापना झाली होती. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three IISER scientists from Pune are Fellows of Indian Academy of Sciences